breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दिलेला शब्द खरा ठरवणारा राजकारणातील योद्धा अजितदादा पवार- बापूराव सोलनकर

बारामती: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलवली ती म्हणजे राष्ट्रवादीचे दोन अ’न’मोल रत्न अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतून जर प्रचारात कोणाला मागणी होती तर ती म्हणजे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांना. आता याचीच बक्षिशी अमोल मिटकरी यांना मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विधानसभा निवडणूक होताच जाहीर केलं होते.दिलेला शब्द खरा ठरवणारा राजकारणातील योद्धा खंबीर नेतृत्व अजितदादा पवार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी सांगितले

‘मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,’ असं एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते. आणि पुरंदर चे विजय शिवतारे पराभूत झाले मात्र, आता त्यांनीच अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याला आमदार करणार असल्याची घोषणा केली होती. अमोल मिटकरींनंतर पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले होते. खर तर अजित पवारांनी घोषणा करताच मिटकरींना विधान परिषदेची दारे खुली झाली होती. त्याच्यावर आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा करताच शिक्कामोर्तब झालं आहे.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अमोल मिटकरी यांची जडणघडण मराठा सेवा संघात झाली. संभाजी ब्रिगेडने त्यांना राज्यभर स्टेज मिळवून दिले. गेल्या काही वर्षात मिटकरी यांनी राज्यभर त्यांना मानणारा आणि त्यांच्या वक्तृत्वावर प्रेम करणारा एक वर्ग निर्माण केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदारपणे टीका केली होती. त्यांच्या भाषणांना मोठा प्रतिसाद मिळत होता. अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी शिवस्वराज यात्रेच्या सभांत भाजपवर जोरदार टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. त्याचा फायदा पक्षाला झाला त्यामुळे अजित दादा पवार यांनी त्यांचा सन्मान केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button