breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील ससून रुग्णालयासमोर प्राध्यापकांचे आंदोलन

पुणे-पिंपरी / महाईन्यूज

महाराष्ट्र शासनाच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्व तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेले सहायक प्राध्यापक यांनी त्यांना सेवेत कायम करणे व सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरु केलेले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे.

तात्पुरत्या सहायक प्राध्यापक यांचेप्रमाणेच तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या देखील काही मागण्या असून बै. जी. शासकीय महाविद्यालयामध्ये तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेकडून आंदोलनास पाठींबा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्त आजपासून (दि. 3) सर्व वैद्यकीय अधिकारी हे काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्या

१ ) सर्व तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमीत करून त्यांना कायमस्वरुपी शासकीय सवेत रुजू करुन घ्यावे.

२ ) सर्व तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमीत करताना कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या अटी शर्ती न लावता सर्वांना नियुक्तीच्या शुन्य दिवसापासून नियमीत करुन कायमस्वरुपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.

३ ) सर्व तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमीत सर्वांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी.

४ ) सर्व तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच, प्रथम रुजू झालेल्या दिवसापासून ते आजतागायत पगारातील फरक सातव्या आयोगाप्रमाणे मिळावा.

उपरोक्त मागण्या वारंवार पाठपुरावा करुन देखील मान्य केल्या जात नाहीत. यास्तव, यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तात्पुरत्या नियुक्तीवरील सहायक प्राध्यापक यांच्या कामबंद आदोलनात बै. जी. शासकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी देखील सोमवारी (दि. ९) पासून सक्रियपणे सहभागी होतील. तरी, तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्याचा गांभीर्यपूर्वक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button