breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

HSC Result: ‘आनंदवन’मधील दिव्यांग विद्यार्थ्यांनीही मारली बाजी, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १०० टक्के

चंद्रपूर । येथील वरोरा गावात समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपण मिळते. तसेच, सन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. या शिक्षणाच्या सुविधेचा उपयोग करुन अनेकांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात इयत्ता १२ वीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. सर्व शाळा-महाविद्यालयांनी आपआपल्या गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  तसाच आनंदोत्सव सध्या ‘आनंदवन’ मध्ये पहायला मिळतोय..

आनंदवनमधील संधीनिकेतन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर्षी इयत्ता १२ वी साठी १७ नंबर फॉर्म भरुन परीक्षा दिली होती. केंद्रातील सर्व १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रणय नागपूरे याने ७७.६ टक्के गुण मिळवून संधीनिकेतनमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच, प्रगती कुलसंगे (६६.३३ टक्के), अतुल मढवी (६६.३०टक्के) असे गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. शीतल आमटे- कराजगी यांनी अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button