breaking-newsमनोरंजन

नेहा धुपिया आणि अंगद बेदी विवाहबद्ध

सोनम कपूरच्या लग्नाच्या बातम्यांचा ओघ कमी होतो न होतो, तोपर्यंत आता नेहा धुपियाच्या लग्नाचीही बातमी येऊन थडकली आहे. नेहा धुपियाही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेता अंगद बेदीबरोबर नेहाने सात फेरे घेतले आहेत.

“मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडबरोबर लग्न केले आहे.’ असे नेहाने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अंगद बेदीनेही आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून विवाहाची घोषणा केली आहे. नेहा आणि अंगद यांचा विवाह शिख पारंपारीक पद्धतीने झाला असावा, असे फोटोवरून लक्षात येते. या दोघांनी आतापर्यंत कधीही आपल्या रिलेशनशीपबाबत व्याच्यता केलेली नव्हती. अगदी अलिकडेच त्यांचे अफेअर सुरू असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे अचानक आलेल्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच सरप्राईज मिळाले आहे.

संपूर्ण बॉलिवूडने सोनम आणि आनंदच्या लग्नाचा जश्‍न साजरा केला असताना नेहाने मात्र आपल्या लग्नाबाबत कोणालाही काहीही खबरबात समजू दिले नाही. माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा पुत्र अंगद मात्र क्रिकेटऐवजी अभिनय क्षेत्रात ऍक्‍टिव्ह आहे. त्याने “पिंक’, “टायगर जिंदा है’ आणि “डिअर जिंदगी’सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button