breaking-newsपिंपरी / चिंचवड

रस्त्यावर कचरा जाळून प्रदुषण करणा-या व्यक्ती, आस्थापनांवर पालिकेची दंडात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे चाळीस हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर स्वच्छतेचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. प्रत्येकाने स्वच्छतेसाठी सहकार्य करणे आवश्यक असून त्या द्वारे शहर सुंदर व स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. रस्त्यावर कचरा टाकून दुर्गंधी पसरवू नये तसेच पर्यावरणप्रदूषण करू नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे. तरीही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आरोग्य विभागाचे पथके कार्यरत आहेत.

आज क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार, अंकुश झिटे व विजय दवाळे यांच्या पथकाने कुदळवाडी, चिखली, इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, कामगारनगर, खराळवाडी येथे कारवाई करून सुमारे चाळीस हजार रुपये इतका दंड वसूल
केला.

रस्त्यावर कचरा जाळणाऱ्या कुदळवाडी परिसरात व्यावसायिकांकडून रक्कम रूपये पाच हजार, व खराळवाडी येथील लोटस कोर्ट या हॉटेलवर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, व्यावसायिक भंगार कचरा रस्त्यावर जाळणाऱ्या सद्गुरूनगर, धावडेवस्ती येथील व्यावसायिकाकडून पंचवीस हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कुदळवाडी येथील गुप्ता वजन काट्याजवळ कचरा जाळणा-या संबंधितांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कचरा जाळून प्रदुषण होत असल्याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र, कंपन्यांकडून होणा-या केमिकल मिश्रीत धुरामुळे तसेच, पवना, इंद्रायणी नदीपात्रात सोडल्या जाणा-या दुषीत पाण्याकडे मात्र, पालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button