breaking-newsराष्ट्रिय

तामीळनाडूत एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

कोईम्बतूर – तामीळनाडूतील एका बनावट नोटा झपाई करणाऱ्या युनीटचा भांडाफोड करण्यात आज पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका व्यक्‍तीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन हजार रुपये मुल्यांच्या तब्बल सहा हजार नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांचे मुल्य सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये होतात, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून शनिवारी एक विशेष मोहिम राबवून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. या मोहिमेंतर्गत एका युवकाच्या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.

याप्रसंगी पोलिसांनी त्याच्याकडून 83 लाख रुपये मुल्यांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असत्‌ा त्याने या नोटांची छपाई घरीच केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी वेलंदिपलाय येथील त्याच्या घरावर छापा टाकला असता तेथे 20 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. या कारवाईत कॉम्प्युटर, प्रिंटर आणि एक कटिंग मशीन जप्त करण्यात आले, अशी माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button