breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आयकर विभागाची कारवाई, सलग दुसर्‍या दिवशी चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची टीमने कारवाई केली आहे. सोमवारी इन्कम टॅक्स पथकाने वाड्रा यांच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात सलग 9 तास चौकशी केली होती. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यांतर्गत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.

आयकर विभागाच्या चौकशीनंतर वाड्रा म्हणाले की, या चौकशीचे उद्दीष्ट हे शेतकरी चळवळीसारख्या देशाशी संबंधित खर्‍या प्रश्नांवरुन लक्ष हटवणे आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील बिकानेर येथे वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीकडून काही भूखंड खरेदीसंदर्भात चौकशी करण्यात आली. 2015 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाबाबत मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने वाड्रा यांची चौकशी केली असून 2019 मध्ये त्यांची कंपनी ‘स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ची 4.62 कोटींची संपत्ती जप्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button