breaking-newsआंतरराष्टीय

डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणूक प्रचार अकाउंट ट्विटरकडून बंद

वॉशिंग्टन – ट्विटरकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणुक प्रचार अकाउंट बंद करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप ट्विटने केला आहे. जोपर्यंत अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणे बंद होत नाही तोपर्यंत ट्रम्प यांच्याबाबतची ही कारवाई तशीच राहणार आहे.

ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यामध्ये त्यांनी कोरोनाबाबतीत लहान मुले ही पूर्णपणे इम्युन (रोग प्रतिकारक) आहेत, असे वक्तव्य केले होते. याआधी फेसबुकनेही ट्रम्प यांचे हे वक्तव्य काढून टाकले होते. हे वक्तव्य फेसबुकच्या धोरणाच्या विरोधात होते. त्यानंतर आता ट्विटरनेदेखील ही कारवाई केली आहे. ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, मुलांची प्रतिकारकशक्ती सुरुवातीपासूनच प्रबळ असते. एका विशिष्ट समुदायाबाबत केलेला ट्रम्प यांचा दावा चुकीचा असल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. कारण डिजीज कंट्रोल एंड प्रिव्हेन्शनच्या फेडरल सेंटरनुसार अमेरिकेत साधारण २ लाख ४० हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button