breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास साफ धोब्यांचा नकार!

सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास धोब्यांनी नकार दिला आहे. यवतमाळमध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.

यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात तीन करोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, अशा करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा विषाणू पसरत असल्याची भीती सर्वसामान्यांच्या मनात बसली आहे. त्याचाच परिणाम हा इथल्या धोब्यांवरही दिसून आला आहे, त्यामुळेच त्यांनी रुग्णालयातील करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास नकार दिला.

दरम्यान, योग्य माहितीच्या अभावातून धोब्यांनी कपडे धुण्यास नकार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे असून याबाबत त्यांची जागृती करुन प्रश्न सोडवण्यात येईल. तसेच रुग्णांचे कपडे विशिष्ट निर्जंतुकीकरणाच्या द्रावणात दोन दिवस भिजत ठेऊन नंतर ते धुण्यात येणार असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button