breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

इस्त्रोची ‘गगनयान’ झेप, गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलची चाचणी यशस्वी

Gaganyaan Mission : भारताने गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी आज घेतली. खराब हवामानामुळे चाचणी थांबवण्यात आली. मात्र काही तासांत दुसऱ्यांदा चाचणी घेतली आणि ही चाचणी यशस्वी झाली. क्रू मॉड्यूलचं बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग झालं. हे लँडिंग होताच देशभरातील नागरिकांनी जल्लोष सुरू केला.

गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आली. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं गेलं. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले गेले. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी मीच ‘कटिबद्ध’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?

मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे तीन भाग असतील-सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button