breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हर फ्लो

मुंबई : मुंबईकरांसाठी पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगली बातमी दिलेली आहे. सध्या मुंबईत पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा दुसरा तलाव पूर्णपणे भरुन वाहत आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव रात्री पूर्ण भरुन वाहू लागलेला आहे. 

२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्यावर्षी ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागलेला होता. तर त्याआधी २०१८ मध्‍ये  १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button