breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठेकेदाराने पगार न दिल्याने ‘सुपरवायझर’ने केली आत्महत्या

पिंपरी |महाईन्यूज|

ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई)च्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली.

45 वर्षीय रवींद्र सिंग असं गळफास घेऊन मृत पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांना घटनस्थळावर एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button