breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

नवी दिल्ली – सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, सध्या सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याच्या दरात 355 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 266 रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1791 डॉलर प्रति औंसवर आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज घट झाली आहे. आज प्रति किलो चांदीच्या किंमतीत 1141 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चांदीची किंमत 68 हजार 379 रुपये प्रति किलो झाली आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 26.35 डॉलर प्रति औंस आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button