breaking-newsताज्या घडामोडी

आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे भरदिवसा अपहरण

नाशिक – नाशिकमधील संत आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे चौघा अनोळखी इसमांनी अपहरण केल्याची घटना काल गुरुवारी दुपारी पंचवटी परिसरात घडली. संजीव किशनकिशोर वैद (४४) असे या संचालकांचे नाव आहे

गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील संत आसाराम बापू आश्रमाचे संचालक संजीव किशनकिशोर वैद हे नाशिक आश्रमातील गायींना खाद्य खरेदी करण्याकरीता महिन्द्रा पिकअप हे वाहन घेऊन गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पंचवटीत आले होते. ते सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात आले असता त्यांना ४ अनोळखी इसम त्यांच्या राखाडी रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये बळजबरीने घेऊन गेले अशी फिर्याद राजेश चंद्रकुमार डावर (४२ ) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button