breaking-newsक्रिडा

जागतिक कुस्ती स्पर्धा : पूजा गेहलोत अंतिम फेरीत

बुडापेस्ट : भारताची महिला कुस्तीपटू पूजा गेहलोतने तुर्कच्या झेयनेप येटगिलचा पराभव करून २३ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

या सामन्यात पूजाने २-४ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना झेयनेपला ८-४ असे नामोहरम केले. २०१८मध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या युरोपियन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत झेयनेपने सुवर्णपदक पटकावले होते. आता अंतिम फेरीत पूजाचा जपानच्या हारूनो ओकूनोशी सामना होणार आहे.

गेली तीन वर्षे झालेल्या २३ वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या एकाही खेळाडूला सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. त्यामुळे पूजाकडून भारताला सुवर्णपदकाची आशा केली जात आहे.

पुरुष विभागात बुधवारी भारताच्या रविंदरला ६१ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कारण अंतिम सामन्यात किर्गिझस्तानच्या उलूकबेक झोल्डोशबेकोव्हकडून त्याने पराभव पत्करला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button