breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा लाखांच्या मद्यासह तिघांना अटक

  • राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाची कारवाई 
 राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या पथकाने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात सापळा लावून  तर शहरातील अन्य दोन ठिकाणी छापे मारून बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या करवाईमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली असून अटक केलेल्या तिघांकडून 6 लाख 26 हजार 345 रुपये किमतीचा विदेशी मद्यासाठा जप्त करण्यात आला आहे.
अनंत काकासाहेब कांबळे (वय 23, रा. विनायक नगर, लेन नं.1, शॉप नं.2, आई सोसायटी , पिंपळे गुरव), भावेश परमा भासडीया (वय 39, रा. समुद्र रेसिडन्सी, नवले कॉलेज समोर, नऱ्हे, वडगाव बुद्रूक), कानजी शामजी पटेल (वय 49, रा. ओमकार कॉलनी, गल्ली नं. 2, बालाजी निवास, पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या तिघांसह अन्य एका संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या भरारी पथकाला माहिती मिळाली की, निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची विक्री करणारे दोघेजण येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी भक्ती शक्ती चौकात सापळा रचला. एका अॅक्टिव्हा (एम एच 12 / एन एफ 2308) दुचाकीवर दोन संशयित आल्याचे आढळले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यातील एकजण पळून गेला. सापडलेल्या दुसऱ्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडे बनावट विदेशी मद्याच्या एक लिटर क्षमतेच्या 11 बाटल्या मिळाल्या. पोलिसांनी बनावट विदेशी मद्यासह मोबाईल फोन आणि दुचाकी असा 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करून शिवकृपा कॉलनी, त्रिवेणी नगर, तळवडे येथे छापा मारला. या छाप्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, आणि विविध विदेशी ब्रॅण्डचे बनावट मद्य बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्या, नविन बुचे, टोपा, लेबल्स, प्लास्टिक पट्टी, मोनोकार्टन, हेयर ड्रायर, कात्री, टोच्या, फनेल, फेव्हीक्विक, बनावट स्कॉच बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 54 हजार 375 रुपयांचा ऐवज जप्त केला.
दुसऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडे कसून चौकाशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून सांगवी येथील हिराई हाईटस, लक्ष्मीनगर गल्ली नं. 1, कदमवाडा, पिंपळे गुरूव येथे छापा मारला. या छाप्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्य तौर करण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 60 हजार 770 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
तिन्ही कारवायांमध्ये एकूण 6 लाख 26 हजार 345 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार संचालक अंमलबजावणी व दक्षता यांच्या निर्देशान्वये भरारी पथक महाराष्ट्र चे निरीक्षक दिपक परब, दुय्यम निरीक्षक दिलीप काळेल, सर्वश्री जवान कुंभार, रनकांब या पथकाने केली. निरीक्षक दीपक परब तपास करीत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button