breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

अंदमान: धनुष्य हाती घेतलेल्या आदिवासींना पाहून पोलीस परतले

अंदमान-निकोबार येथे अमेरिकन नागरिक जॉन अॅलन चाऊची हत्या झाल्यानंतर शनिवारी पोलिसांना एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. अमेरिकन नागरिक चाऊचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हातात धनुष्य-बाण घेतलेल्या आदिवासींना सामोरे जावे लागले. आदिवासींच्या हातातील धनुष्य पाहून पोलीस पथकाला आल्यापावली परतावे लागले.

स्थानिक पोलीस प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, शनिवारी उत्तर संथाली बेटाकडे रवाना झालेल्या पथकाला तिथे काही आदिवासी दिसले. त्याच भागात चाऊ अखेरचा दिसला होता. किनाऱ्यापासून ४०० मीटर दूर समुद्रात बोटीत बसलेल्या जवानांनी दुर्बिणमधून पाहिले असता ते आदिवासी धनुष्य-बाण घेऊन उभे होते. आदिवासींचा तो पवित्रा पाहून पोलीस पथक पुन्हा माघारी फिरले.

चाऊ हा आदिवासींना ख्रिश्चन धर्माबाबत काही सांगत होता. त्याचवेळी आदिवासींनी त्याची हत्या केली होती. पोलीस हे संथाली बेटावरील लोकांबरोबर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.

दि. १७ नोव्हेंबर रोजी चाऊचा मृत्यू झाला होता. अद्यापपर्यंत त्याचा मृतदेह मिळालेला नाही. चाऊला आदिवासींनी बेटावरच दफन केले असल्याचे काही मासेमाऱ्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button