breaking-newsताज्या घडामोडी

द्राक्षांना उन्हापासून वाचवण्यासाठी १२०० साड्यांचा मांडव…शेतकऱ्याची नामी शक्कल…

वाढत्या उन्हाचा परिणाम द्राक्ष पिकावर होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने नामी शक्कल लढवली आहे. पापरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी लक्ष्मण भोसले यांनी द्राक्षमनी तड़कू नये व घडावर उन्हाचा मारा रोखण्यासाठी तीन एकर द्राक्ष बाग १२०० साड्यांनी झाकली आहे. पापरी (ता. मोहोळ, जि.सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण भोसले यांनी टाकाऊ साड्यांचा टिकाऊ वापर केला आहे. 

आपल्या प्रयोगाबद्दल बोलताना भोसले म्हणाले की, माझ्याकडे ३ एकर सुपर सोनाका जातीची द्राक्ष बाग आहे. बागेचा बहार धरलेला असून बागेवरील घडाच्या द्राक्षमन्यात पाणी भरण्याच्या अवस्थेत ते होते. परन्तु याच वेळी मागील महिन्यात वातावरणात पहाटे थंडी तर दुपारी ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण असा सतत बदल होत होता. याचा दुष्परिणाम घडावर होउन द्राक्षमनी तड़कू लागले होते. ते गळून खाली पडू लागले होते. यावर मात करण्यासाठी सोलापूर व अन्य ठिकाणी कपड्याच्या बाजारात जाऊन जुन्या साड्या नाममात्र दरात म्हणजे १५ रु. प्रतिनग प्रमाणे १२०० साड्या खरेदी केल्या. संपूर्ण द्राक्ष बागेवर त्या अंथरुन त्याचा मांडवच घातला आहे. 

गेल्या एका महिन्यापासून द्राक्ष बागेवर हा मांडव घातलेला असून पापरी-देवडी रस्त्याच्या कडेलाच बाग असल्याने इतर शेतकरी व प्रवासी याकडे उत्सुकतेने पाहताना दिसतात. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button