breaking-newsआंतरराष्टीय

जगातील कुठलीही शक्ती चीनला रोखू शकत नाही – जिनपिंग

बीजिंग : जगातील कुठलीही शक्ती चीनला आता पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मंगळवारी चीन प्रजासत्ताकाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सांगितले. यावेळी लष्कराचे मोठे संचलन झाले त्यात शक्तिप्रदर्शनाचा हेतू होता.

चीनने सर्वात मोठे लष्करी  संचलन आयोजित केले असताना हाँगकाँगमध्ये मात्र चीनच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात हिंसक निदर्शने करण्यात आली. यावेळी चीनचे ध्वज जाळण्यात आले. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी स्वायत्तता व स्वातंत्र्याची मागणी केली असून गेले काही महिने हे आंदोलन जोरात सुरू आहे.

लष्करी संचलनावेळी जिनपिंग यांनी सांगितले की, जगातील कुठलीही शक्ती आता चीनला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. यावेळी संचलनात आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व शस्त्रास्त्रे प्रदर्शित करण्यात आली. चीनच्या वीस लाख सैन्याच्या वतीने संचलन करण्यात आले.

माओ झेडाँग यांच्यानंतर चिनी कम्युनिस्ट पक्षातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून जिनपिंग ओळखले जातात. मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांच्या समवेत आधीचे अध्यक्ष जियांग झेमिन (वय ९३), हू जिंताओ (७६) या नेत्यांनी हजेरी लावली यातून चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील एकीचे दर्शन घडवण्यात आले. अमेरिकेशी स्पर्धा असताना जिनपिंग यांनी चीनचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे.

क्षी जिनपिंग यांनी सांगितले की, सत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी कॉमरेड माओ झेडाँग यांनी चीन प्रजासत्ताकाच्या स्थापनेची घोषणा केली होती. ‘चीनच्या उदयाची  भीती कुणी बाळगण्याचे कारण नाही  कारण आमचा शांततामय विकासाचा मार्ग कुणाच्या आड येणार नाही’ असे सांगून ते म्हणाले की, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ व पीपल्स आर्मड पोलीस फोर्स यांची भूमिका निश्चित असून चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा व विकास यांचे हितरक्षण करणे यासाठी ते काम करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button