breaking-newsराष्ट्रिय

ठार केलेल्या निरीक्षकाचा मोबाइल हस्तगत

बुलंदशहर दंगलीतील आरोपीच्या घरी छापा

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे गोहत्येच्या संशयावरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलिस निरीक्षकाचा खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरात या निरीक्षकाकडून हिसकावलेला मोबाइल सापडला आहे. त्यानेच पोलिस निरीक्षक सुबोधकुमार यांना गोळी मारल्याचा संशय आहे. बुलंद शहर घटनेनंतर दोन महिन्यांनी हा फोन सापडला आहे.

बुलंदशहर येथील सियाना येथे ३ डिसेंबरला जमावाने पोलिसांशी संघर्ष केला होता.  गोहत्येनंतर संबंधित खेडय़ात आणून टाकण्यात आलेल्या गाईंचे सांगाडे पाहिल्यानंतर त्यात उजव्या गटांनी दंगल केली होती. यातील प्रमुख आरोपी प्रशांत नट याच्या घरात छापा टाकला असता त्याच्याकडे पाच मोबाइल फोन सापडले असून त्यातील एक मारले गेलेले पोलिस निरीक्षक सुबोध कुमार यांचा आहे. नट याला १८ डिसेंबरला सिकंदराबाद येथे अटक करून तुरूंगात टाकण्यात आले आहे. सुबोध कुमार यांचा मोबाइल नट याच्या घरात लपवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर तपास वॉरंट जारी करण्यात आले, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. क्लोज युजर ग्रुप मोबाइल फोन नट याच्या घरात सापडला असून इतरही फोन त्यात होते. निरीक्षक सुबोध कुमार यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली ते अजून सापडलेले नाही. नट (वय २६) हा चिंग्रावतीचा रहिवासी असून तो दिल्लीत अंशकालीन चालक म्हणून काम करीत होता. याच दंगलीत चिंग्रावती येथे वीस वर्षांचा सुमीत कुमार हा रहिवासी ठार झाला होता. सियाना पोलिसांनी या प्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यात खून, दंगल, देशद्रोह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे आरोप ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत यात ३८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्र अधिकारी राघवेंद्र मिश्रा यांनी दिली. अटक केलेल्यात बजरंग दलाचे बुलंदशहर समन्वयक योगेश राज, भाजयुमोचे सियाना शाखा प्रमुख शिखर अगरवाल, लष्करी जवान जितेंदरप मलिक, कालुआ यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button