breaking-newsआंतरराष्टीय

महाभियोग प्रकरण : संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे गिलियानी यांना आदेश

वॉशिंग्टन : युक्रेन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताबडतोब महाभियोग समितीकडे जमा करावीत, असा आदेश प्रतिनिधिगृहाच्या डेमोक्रॅटिक नेत्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील रूडी गिलियानी यांना दिला आहे. बिदेन व त्यांच्या मुलाविरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावण्याच्या प्रयत्नात गिलियानी यांनी ट्रम्प यांना मदत केली होती.

प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीचे अध्यक्ष अ‍ॅडम शिफ व इतर दोन चौकशी समित्यांचे प्रमुख यांनी गिलियानी यांना समन्स पाठवले असून त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित असलेली कागदपत्रे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांनी बिदेन यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्हालोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता. बिदेन हे २०२० मधील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी ट्रम्प यांनी हा कुटील डाव आखला होता. त्यात गिलियानी यांनी मदत केली असून ते व त्यांच्या तीन व्यवसाय सहायकांनी याबाबत पाठवलेले संदेश व इतर बाबींची कागदपत्रे सादर करावीत, असे आदेशात म्हटले आहे.

ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना दूरध्वनी करून त्यांना बिदेन व त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले होते. बिदेन व त्यांच्या मुलाचे युक्रेनमध्ये उद्योग व्यवसाय आहेत. या सगळ्या प्रकरणाबाबत एका व्यक्तीने तक्रार केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चौकशीची कारवाई सुरू झाली आहे.

गिलियानी हे न्यूयॉर्कचे माजी महापौर असून त्यांनी दूरचित्रवाणी कार्यक्रमात अशी कबुली दिली होती की, ट्रम्प यांचे वकील म्हणून आपण युक्रेन सरकारला माजी उपाध्यक्ष बिदेन यांना लक्ष्य करण्यास सांगितले होते. समितीने म्हटले आहे की, या प्रकरणात पुरावे ठरू शकतील असे संदेश, फोन नोंदी व इतर गोष्टी गिलियानी यांच्याकडे आहेत, याचा अर्थ ट्रम्प प्रशासनाचे इतर अधिकारीही यात सामील आहेत. त्यामुळे ही सर्व कागदपत्रे गिलियानी यांनी चौकशी समितीला सादर करावीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button