breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अबब…! सर्वात मोठी कारवाई, तब्बल 1000 कोटींचे ड्रग्स जप्त, माफियाची पद्धत पाहून पोलीस हैराण

नवी मुंबई: नवी मुंबईतील नाव्हा शेव्हा पोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय आणि कस्टम विभागाने  मोठी कारवाई करत  तब्बल 1000 कोटी किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. प्लास्टिकच्या पाइपमधून हेरोइन्स ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचे समोर आलेले आहे. हे ड्रग्स अफगानिस्तान आणि इराणहुन मुंबईत समुद्राच्या मार्गाने आणण्यात आले होते.  आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे. ड्रग्स माफियांनी कंटरेनमध्ये प्लास्टिकच्या पाईपांमध्ये हेरोइन्स लपवून ठेवले होते. त्या प्लास्टिकला अशा प्रकार रंग मारण्यात आलेला होता की, जणू त्या बांबूच्या काठ्या आहेत.

एवढंच नाहीतर ड्रग्स माफियांनी हे साहित्य आयुर्वेदिक औषधी असल्याचा बनाव केलेला होता. या प्रकरणी दोन कस्टम एजंटना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय इम्पोर्ट आणि फायन्सस पुरवणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे. दोघांनाही मुंबईत आणले जाणार आहे.पोलिसांनी नेरुळ येथील एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशनचा कस्टम एजंट मिनानाथ बोडके, मुंब्य्रातून कोंडीभाऊ गुंजाळ या दोघांना अटक केली आहे. कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतची कस्टम विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. याआधीही जानेवारी 2019 मध्ये पंजाब पोलिसांच्या एसटीएफने194 किलो हेरोइन अमृतसरमध्ये जप्त केले होते. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button