breaking-newsआंतरराष्टीय

इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

बगदाद | महाईन्यूज

इराणच्या सैन्याकडून आज (ता. 8) पहाटे साडेपाचच्या दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. तब्बल डझनभरहून जास्त बॅलेस्टीक मिसाईलने अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून इराणने हा हल्ला केल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

इराकमधील इरबिल, अल् असद या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हा हल्ला झाल्याची माहिती अमेरिकेने दिली आहेत. या हल्ल्यात कोणी मृत्युमुखी झाले आहे का याबाबत अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. इराणने हा हल्ला स्वसंरक्षणासाठी व देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केला. युएनच्या आर्टीकल 15 नुसारच हा हल्ला करण्यात आला आहे. आम्हाला युद्ध पुकारायचे नाही, पण आम्हाला स्वसंरक्षणाची गरज असल्याचे, इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाला इराण, इराक व आखाती देशांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1214739853025394693

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हणले आहे की, ‘इराणने अमेरिकेच्या दोन सैन्य तळांवर मिसाईल हल्ला केला आहे. आम्ही सर्वशक्तीमान व शक्तिशाली आहेत. जगात कोणापेक्षाही ताकदवान लष्कर आमच्याकडे आहे. यावर उद्या सकाळी आम्ही बोलू.’ या ट्विटमुळे आता या दोन देशांमधील तणाव आणखी वाढतो की पुढे काय होणार याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button