breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभेत शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ

पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेनेच्या वतीने माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र अभियानअंतर्गत चिंचवड विधानसभेत प्रभाग निहाय बैठका सुरू आहेत. प्रत्येक प्रभागात ४ शाखा प्रमुख आणि ४ महिला शाखा संघटिका यांच्या माध्यमातून प्रभागनिहाय शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

सांगवी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी या ठिकाणी बैठका संपन्न झाल्या. यावेळी लोकसभा निवडणुकी दरम्यान विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. लोकसभा विजया करीता घेतलेल्या परीश्रमाबद्दल प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानण्यातआले. प्रभाग तिथे शाखा सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.  शाखेमार्फत दैनंदिन कामकाजाचे स्वरूप काय असावे. शाखेमध्ये विविध समाज उपयोगी, कल्याणकारी योजनांचे फॉर्म, तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, महीला युवसेना अधिकारी शर्वरी जळमकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून सक्षमपणे नगरसेवक, लोकप्रतिनिधीला साजेसे समाजहिताचे काम प्रभागनिहाय शाखा प्रमुखांनी करावे, ह्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद पक्ष देईल, असे आवाहन केले.

हे अभियान यशस्वी होण्यासाठी विजय साने, चेतन शिंदे, बाळासाहेब वाल्हेकर, सुरेश राक्षे, राहूल पोंगडे, अमित सुहासे, अमित निंबाळकर, प्रकाश घोरपडे, स्वरूपा खापेकर, पूर्वा निंबाळकर, किर्ती घोरपडे, अविनाश कवडे, अतुल पोंगडे, अमित खरात, मछिंद्र देशमुख, विवेक तितरमारे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, भाग्यश्री म्हस्के, शारदा वाघमोडे, अमोल राठोड, सुहास शहाळे, गणेश आहेर, सुधा नाईक, गणेश वायभट, अनिल पालांडे, अंकुश कोळेकर, नरसिंग माने, शिल्पा अनपन, कमल गोडांबे, श्वेता कापसे, भाग्यश्री म्हस्के, उषा अल्हाट, तेजस्वी गायकवाड, वंदना वाल्हेकर, आशा पवार, सारीका शिंदे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button