breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“अब की बार, पदवीधर सरकार !” पदवीधर हक्क समिती लोकसभा लढविणार, पहिली उमेदवार यादी जाहीर 

– महाराष्ट्र पदवीधर हक्क संरक्षक समितीचा निवडणूक जाहीरनामा जाहीर
पुणे, ( महा ई न्यूज ) –  ‘सेट/नेट, डीटीएड, बीएड, एमएड, राज्यसेवा व इतर स्पर्धा परिक्षा’ तयारी करणारे सर्व पदवीधर यांच्या न्याय्य हक्कांची गेल्या दहा वर्षांपासून शासनाकढून पायमल्ली केली जात आहे. यास महाराष्ट्रातील सत्ताधारी तसेच विरोधकसुद्धा समसमानरित्या जबाबदार आहेत.  १००% प्राध्यापक व शिक्षक भरती सुरु झाली पाहिजे, राज्यसेवा व इतर स्पर्धा परिक्षेच्या जाहीराती आल्या पाहिजेत व पदवीधरांची पदभरती झाली पाहीजेत यासाठी संबंधित पात्रताधारक कित्येक वर्षांपासून अर्ज, विनंत्या, आंदोलने इत्यादी मार्गाने पाठपुरावा करीत आहोत. परंतु, अद्याप शासनाने आपल्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आम्ही आपल्या मागण्या काही प्रमाणात मान्य केल्या आहेत, असा अभास निर्माण केला जात आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सेट, नेट, पीएच.डी., डीटीएड., बीएड., स्पर्धा परिक्षा तयारी करणारे सर्वच पदवीधारक यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. आज पर्यंत ४ ते ५ पात्रताधारकांनी मानसिक, आर्थिक अपमान व अवहेलना सहन न झाल्याने आत्महत्या केल्या आहेत.* ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आमच्या आंदोलन काळात सर्वच विरोधी पक्षानी चुप्पीचे धोरण स्वीकारले होते. कोणताही विरोधी पक्ष आमच्या समर्थनार्थ सक्षमपणे रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्र्यात दिसला नाही. राज्यातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून आम्ही आमच्या समस्यांबाबत त्यांना अवगत केले होते. परंतु; त्यास त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील उच्च शिक्षित पदवीधरांची स्थिती अत्यंत बिकट अवस्थेत आहे. त्यांना पदोपदी मानसिक, आर्थिक अपमानास सामोरे जावे लागत आहे. पदवीधारकांच्या हालाखीस सत्ताधारी व विरोधक दोघेही जबाबदार आहेत.
त्यामुळे आता आमच्या  न्याय हक्कांचे संरक्षण आम्हीच लोकसभेच्या रिंगणात उतरत आहोत. “अब की बार, पदवीधर  (ग्रॅज्युएट) सरकार!”  ही घोषणा दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा व उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे आज  जाहीर केली आहे.
लोकसभा उमेदवारांची मतदारसंघनिहाय पहिली यादी
1) कंधारकर हनुमंत नारायणराव,  M.S.W.; M.Phil. (नांदेड लोकसभा मतदारसंघ) –
2) रविराज उर्फ रवींद्र विष्णुदास राठोड, M.A.;B. Ed; Ph. D. (वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघ)
3) डॉ.एस.एन.जाधव -पाटील M.Com, M.A,GDC&A, DCA,Ph.D (पुणे लोकसभा)
4) डॉ.किशोर महादेव खिलारे (सोलापूर लोकसभा मतदारसंघ) M.A.,M.Phil,Ph.D.,SET, NET
5) प्रा.सुरेश देवढे-पाटील, M. Com., M.Phil., SET, NET (अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ)
6) प्रा.अनिल सुभाष झेंडे, M. A., NET, SET (हातकणंगले लोकसभा मतदारसंघ)
7) भीमाशंकर लक्ष्मण गायकवाड,  (उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ) M.A,M.Phil, NET
8) डॉ. दत्तात्रय सौदागर सावंत,  M.A, M.Phil,Ph.D. (माढा लोकसभा मतदारसंघ)
9) सौ. जया मच्छिंद्र देसाई, M.A, M.Phil, D.Ed,B.Ed  (औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ)
10) डॉ.राज चव्हाण,  M. A., M. Phil.Ph. D. NET  (कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ)
          आजच्या बैठकीस डॉ. किशोर खिलारे, श्री. सुरेश देवढे- पाटील, श्री. हनमंत (पिंटू भाऊ) कंधारकर,  रविराज राठोड, डॉ. शिवराज जाधव- पाटील, श्री. अनिल झेंडे, श्री. महावीर साबळे, श्री. रोहिदास दुधाटे, डॉ. शिवाजी बल्लोरे, डॉ. राजेश कुंटुरकर, डॉ. परमेश्वर पौळ, डॉ. प्रविण शिंदे- पाटील, डॉ. शैलेश अत्राम, डॉ. प्रमोद तांबे, डॉ. अमोल पवार, डॉ. दादासाहेब रणदिवे इत्यादी उपस्थित होते.
              *निवडणुक जाहीरनामा*
1) पदवीधरांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी शासकीय व निमशासकीय आस्थापनावरील सर्व रिक्त पदे कायम स्वरुपी भरली जातील.
2) शासकीय सेवेत कंत्राटीकरण ही संकल्पना हद्दपार करण्यात येईल.
3) समाजातील सर्व घटकांना रोजगाराची १००℅ हमी देण्यात येईल.
 4) शिक्षणावरील खर्च 15℅ पर्यंत वाढवण्यात येईल तसेच शिक्षणातील भ्रष्टाचार हद्दपार केला जाईल.
5) प्राध्यापक व शिक्षकांची सर्व पदे पारदर्शकरित्या भरली जातील.
5) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, पाणी, खते, बी-बीयाने देऊन स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल.
6)व्यापार, व्यवसाय व  उद्योजक यांना आवश्यक भांडवल, कर्ज पुरवठा, सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
7) महिलांचे सामाजिक,आर्थिक व राजकीय सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
8) देशाचे सार्वभौमत्व, लोकशाही व्यवस्था व संस्था यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असु.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button