breaking-newsमनोरंजन

…म्हणून विकी कौशलला नेटकऱ्यांनी दिला रणवीरपासून दूर राहण्याचा सल्ला

अभिनेता रणवीर सिंग व विकी कौशल हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. आतापर्यंत या दोघांनी एकही चित्रपट एकत्र केलेला नाही, मात्र जेव्हा हे दोघं एकत्र भेटतात तेव्हा मात्र त्यांचा ‘कल्ला’ असतो. शनिवारी रणवीरचा वाढदिवस होता. त्यामुळे बी-टाऊनमधल्या सर्वच कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच विकीने एक फोटो पोस्ट केला आणि त्याची तुलना थेट रणवीरशी होऊ लागली.

विकीने ‘वोग’ मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. त्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र यापैकी एका फोटोमधील विकीचे कपडे पाहून नेटकऱ्यांना रणवीर सिंगच आठवला. नेमका हा फोटो त्याने रणवीरच्या वाढदिवशीच पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

‘रणवीरपासून तू लांब राहत जा,’ असा सल्ला एका युजरने दिला. तर ‘रणवीरपासून आदर्श घेतलास की काय?’ असा प्रश्न एकाने केला. तर ‘घरच्या पडद्यांचा कपडा फाडून हा ड्रेस शिवल्यासारखा वाटतो’, अशा शब्दांत एकीने खिल्ली उडवली. रणवीर सिंग अशाप्रकारे अतरंगी कपडे परिधान करण्यासाठी ओळखला जातो.

या दोघांच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर वाढदिवसानिमित्त रणवीरच्या ’83’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे विकी हा उधमसिंहच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button