breaking-newsमनोरंजन

कमाईमध्ये ‘गली बॉय’चं वर्चस्व , ‘खान’दानाला टाकलं मागे

‘रामलीला’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’ या सारख्या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. यशराज बॅनरच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारा रणवीर आज कलाविश्वातील नावाजलेला आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता आहे. रणवीरने कमी कालावधीमध्ये स्वत: सिद्ध करुन दाखवलं. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर त्याचा दबदबा निर्माण झाला. विशेष म्हणजे रणवीरने बॉक्स ऑफिसच्या कमाईमध्ये बॉलिवूडमधील तीनही खानला मागे टाकलं आहे. रणवीरच्या तीन चित्रपटांनी एकूण ७०० कोटींची कमाई करुन दिली आहे.

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटाने ३०२.१५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रणवीर, दीपिका आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बराच वाद निर्माण झाला होता. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

‘पद्मावती’ चित्रपटाप्रमाणेच रणवीरचा ‘सिम्बा’ हा चित्रपटही तुफान लोकप्रिय झाला. २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर २४० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला असून अभिनेत्री सारा अली खानने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २ महिन्यांमध्येच त्याचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर १४० कोटींची कमाई केली.

दरम्यान, रणवीरच्या या तीनही चित्रपटांनी केवळ दीड वर्षांमध्ये ६८२.१५ कोटींची कमाई केली आहे. इतकंच नाही तर एवढ्या कमाईत त्याचा समकालीन कोणताही अभिनेता नव्हता. केवळ रणवीरच्या तोडीची कमाई सलमान खानने केली. त्याचे जुलै २०१५ के ऑगस्ट २०१६ या दरम्यान, ‘बजरंगी भाईजान’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘सुलतान’ चित्रपट प्रदर्शित झाले. या १३ महिन्यामध्ये सलमानने ८३०.९५ कोटींची कमाई केली. त्यामुळे येत्या काळामध्ये कमाईच्या बाबतीत रणवीर आणि सलमान यांची टक्कर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button