breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड गावात पालिकेचा स्वागत कक्ष नाही, पदाधिकारी पोलीस कक्षात अासनस्त

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे चिंचवड येथील चापेकर चौकात उभारण्यात येणारा स्वागत कक्ष यंदा उभारण्यात आला नाही. कक्ष उभारण्यासाठी न्यायालयाच्या नियमाचा अडसर असल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे.

महापालिकेच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी चिंचवड येथील चापेकर चौकात कक्ष उभारला जातो. परंतु, यंदा कक्ष उभारण्यात आला नाही. पोलिसांच्या स्वागत कक्षातच पालिकेचे अधिकारी बसले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेने स्वागत कक्ष उभारले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेलाच कसली अडचण आहे, असा सवाल गणेश भक्तांनी उपस्थित केला आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “सण उत्सवावर खर्च करू नये असा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे कक्ष उभारण्यात आला नाही. पुढील वर्षी दक्षता घेण्यात येईल”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button