breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये रात्री उशिरापर्यंत मंडळांची संत गतीने मिरवणूक

पिंपरी – चिंचवड गावात दरवर्षी रात्री नऊ वाजेपर्यंत अनेक गणेश मंडळांच्या ढोलताशा पथकाची प्रात्यक्षिके होत असत. मात्र, या वर्षी रात्री नऊ वाजून गेले असता केवळ नऊ गणेश मंडळे विसर्जन घाटाकडे मार्गस्त झाली आहेत. अत्यंत धिम्या गतीने विसर्जन मिरवणुकीची सुरूवात झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिंचवड भागातील पदाधिकारी गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी चापेकर चौकात आले आहेत. मात्र, पालिकेचा स्वागत कक्ष नसल्यामुळे त्यांची बसण्यासाठी तारांबळ उडाली आहे. तात्पुरते पोलीस प्रशासनाने आपल्या कक्षात त्यांना जागा दिली आहे. त्याठिकाणी हे पदाधिकारी आसनस्त झाले आहेत. तेथूनच गणेश मंडळाच्या स्वागताचा सोपस्कार सुरू आहे. माजी महापौर अपर्णा डोके, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, राजेंद्र गावडे, अश्विनी चिंचवडे, नामदेव ढाके, सुरेश भोईर आदी पोलीस कक्षात उपस्थित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button