पिंपरी l प्रतिनिधी
विजेच्या ट्रान्सफार्मर मधील तांब्याच्या तारा आणि ऑईल असा दोन लाख 67 हजारांचा माल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) सकाळी तळवडे येथे उघडकीस आला.
महावितरण अधिकारी निकिता इंगोले यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा ते सकाळी सहा वाजताच्या कालावधीत तळवडे येथील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या कालावधीत अज्ञात चोरट्याने विजेच्या 100 के व्ही ए ट्रान्सफार्मर खांबावरून खाली उतरून त्यातील तांब्याच्या तारा आणि ऑईल असा एकूण दोन लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.