breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मराठी भाषिकांवरील अत्याचार प्रकरणी शरद पवार अमित शहांना भेटणार

मुंबई | प्रतिनिधी 
शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबणेनंतर त्या घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामुळे चिडलेले कर्नाटक सरकार आणि तिथल्या कन्नड वेदिके सारख्या संघटना सीमा भागातील मराठी माणसांना अधिक त्रास देऊ लागल्या आहेत. तर कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आज एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ असे आश्वासन पवारांनी दिले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असे असतानाही कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार्करीत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे दळवी यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. मात्र त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटताच कर्नाटक सरकार आणि कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी भाषिकांना अधिकच त्रास देणे सुरु झाले. म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत येवून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला मदतीचे आश्वासन दिले तसेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटघेऊन या मुद्द्यावर चर्चा करू असे आश्वासन पवारांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button