breaking-newsमनोरंजन

घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाला फरहान

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधुना यांनी २०१७ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर सामंजस्याने हे दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर फरहानच्या दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे असून ती दोघींचा सांभाळ करत आहे. फरहान आणि अधुनाचा घटस्फोट झाल्यानंतर फरहानने याविषयी वक्तव्य करणं  कटाक्षाने टाळलं होतं. मात्र पहिल्यांदाच तो याविषयी उघडपणे बोलला आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच फरहानने त्याच्या पर्सनल लाइफमधील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. घटस्फोट झाल्याची माहिती तुम्ही मुलींना कशी दिली? असा प्रश्न फरहानला विचारण्यात आला होता. त्यावर मुलींना ही गोष्ट सांगणं फार कठीण होतं असं तो म्हणाला.

‘आमचा घटस्फोट झाला आहे हे मुलींना सांगणं अत्यंत कठीण होतं. कोणतीही गोष्ट त्यांना सांगणं त्यावेळी सोपं नव्हतं. ज्या गोष्टी त्यांना पटणार नाहीत किंवा त्यांना ऐकून घेण्याची इच्छा नसते अशा गोष्टी त्यांना समजावून सांगणं अत्यंत कठीण असतं. त्यातच मुलं ही हुशार असतात त्यामुळे त्यांना सहज फसवता येत नाही. त्यांच्याशी प्रामाणिक राहूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात’, असं फरहान म्हणाला.

पुढे तो म्हणाला, त्यावेळी आई-वडिलांची मानसिकता कशी असते हे त्यांना दिसत असतं. मात्र ते त्यांच्या अकलनापलीकडंच असतं. त्यावेळी आपण सांगितलेली गोष्ट त्यांना पटकन समजत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button