breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कवी, पत्रकार भालचंद्र मगदूम यांचे अल्पशा आजाराने निधन

पिंपरी |महाईन्यूज|

कवी, लेखक, पत्रकार भालचंद्र मगदूम यांचे आज (शनिवारी) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 50 होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.

पिंपरी-चिंचवड येथील दैनिक सामना कार्यालयात भालचंद्र मगदूम हे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. तसेच लेखक, कवी म्हणून शहरात प्रसिध्दी होते. मागील काही दिवसापासून ते पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मगदूम यांचे मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील गंडहिंग्लज मधील बेळगुंदी येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button