breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा अपघात, मुख्यमंत्री सुखरूप

पुणे | महाईन्यूज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बचावले आहेत. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. पेण या ठिकाणी प्रचारसभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण बोरगाव या ठिकाणी लँड झाले.

हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतल्याने खोळंबा झाला. पायलटचे हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटले. मात्र, प्रसंगावधान दाखवत त्याने पुन्हा नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे स्वीय सचिव, एक इंजिनिअर, एक पायलट आणि एक को पायलट असे पाचजण होते. हेलिगो प्रा. लि. चे हे हेलिकॉप्टर होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. या सगळ्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button