breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

गोवा निवडणूक : आम्ही संघटित; भाजपचेच उमेदवार विजयी होणार : ज्योशुआ डिसोझा

म्हापसा । टीम ऑनलाईन

आम्ही सगळेजण संघटितपणे काम करीत असून बार्देश काबीज करणे आमचे ध्येय आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांनी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. बार्देश तालुक्यातील सातही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आमदार ज्योशुआ डिसोझा, माजी आमदार रोहन खंवटे, माजी मंत्री दयानंद आलेकर यांनी व्यक्त केला.

म्हापसा येथे श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष शुभांगी वावगणकर आणि भाजपचे कार्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डिसोझा म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात आणि महापसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लोकांना अपेक्षित असलेली विकासकामे केली आहेत. म्हापसा मतदारसंघात सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. काही प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी आपले वडील फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा मतदारसंघात चांगले काम केल्यामुळे येथील जनतेने त्यांना वेळा निवडून दिले. त्यानंतर त्यांच्या जागी आपल्याला या भागाचे नेतृत्व करण्याची जनतेने संधी दिली. मागच्या तीन वर्षाच्या काळात आपण चांगल्या पद्धतीने काम केले असून येथील जनता पुन्हा एकदा आमच्याच पाठीशी उभी राहणार आहे.

पुढे डिसोझा म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्या काहींचे म्हापसा मतदारसंघावर लक्ष असून ते भाजप पक्षातील कार्यकत्यांना पक्षापासून तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नाव न घेता केला. पुढे बोलताना डिसोझा म्हणाले की, पक्षातील कार्यकर्ते हे संघटित असून कोणत्याही आमिषाला ते बळी पडणार नाहीत. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांनी आपण ज्या पक्षात आहोत त्याचे काम करावे, दुसऱ्या पक्षात डोकावण्याचा प्रयत्न करू नये.

माजी आमदार रोहन खवटे यांनी बोलताना राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने साधला जावा आणि स्थिर सरकार यावे यासाठी आपण भाजपमध्ये दाखल झालो संपूर्ण बार्देश तालुक्यातील सातही जागा आम्ही एकतर्फी जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला.

माजी मंत्री दयानंद आलेकर म्हणाले, यंदाची निवडणूक स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाशिवाय होत आहे. मात्र, आम्ही राज्यात सर्वाधिक जागा जिंकून स्थिर सरकार आणणार आहोत. तसेच बार्देशातील सातही जागा जिंकून मनोहर भाईंना खऱ्या अर्थाने आदरांजली देऊ असे सांगितले. दरम्यान डिसोझा यांनी श्री देव बोडगेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

  • मतदार हाच राजा: डिसोझा

विरोधकांनी आपली नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.आपण मागच्या अडीच वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. मात्र, विरोधक कामे केली नाहीत अशी ओरड मारून आपली नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण केलेली कामे मतदारांसमोर असून तेच पुढे कोणाला संधी द्यायची हे ठरवतील. मतदार हाच राजा असतो हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असेही डिसुझा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button