breaking-newsक्रिडा

स्वत:चा विक्रम मोडण्याचा विक्रमही ‘किंग कोहली’च्या नावावर

पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार २५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी मजबूत स्थितीत पोहोचला. आधी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि नंतर रवींद्र जाडेजा याच्यासोबत शतकी भागीदारी करताना विराटने कसोटी कारकिर्दीतील ७ वी द्विशतकी खेळी केली.

कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३३६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार लगावले. विराटने या खेळीसह कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच २५० धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने आपला २४३ धावांचा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. महत्त्वाची बाब म्हणजे स्वत:च्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम सर्वाधिक वेळा स्वत: मोडण्याचा विक्रम कोहलीने केला. त्याने सर्वाधिक तब्बल १५ वेळा स्वत:चा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button