breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: एकमेकांमध्ये 1 मीटरचे अंतर न पाळणाऱ्यांना 6 महिने शिक्षा आणि दंड,

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी वेगवेगळ्या देशांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी काही देशांनी आणखी गंभीर आणि कडक नियम घालण्यास सुरवात केली आहे…सिंगापूरने या लढ्यामध्ये एक गंभीर नियम केला आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन व्यक्तींमधील सुमारे १ मीटरचे अंतर न पाळणाऱ्यांना सिंगापूरमध्ये यापुढे सात हजार डॉलरचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. शुक्रवारपासूनच सिंगापूरमध्ये हा नवा नियम अमलात आणण्यात आला आहे. काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

सिंगापूरमध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे कोरोनाविरोधातील लढाईसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंगापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अर्थात त्यांचे प्रमाण परदेशातून सिंगापूरमध्ये आलेल्यांमध्ये जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील सरकारने हा नवीन नियम केला आहे.

सिंगापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणीही दुसऱ्या व्यक्तीपासून एक मीटर अंतरावर उभा राहिला नाही किंवा बसला नाही तर त्याला या प्रकरणी दोषी ठरविण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्याचबरोबर काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या खुर्च्यांवर सरकारने एक चिन्ह रेखाटले आहे. त्या ठिकाणी बसलेल्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे नियम अंमलात असतील. सर्व नागरिकांना, प्रवाशांना आणि व्यावसायिकांना ते पाळणे बंधनकारक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button