breaking-newsपुणेमहाराष्ट्र

ग्रामीण नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी “ओपन जीम’

  • दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर : 73 ठिकाणचे काम अंतीम टप्प्यात

पुणे – नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना चालता-बोलता व्यायाम करता यावा यासाठी शहरात “ओपन जीम’ सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातही “ओपन जीम’ उभारण्यात आल्या आहेत. या जीममध्ये 13 प्रकारे विविध साहित्य असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी दिली.

सध्या शहरांमध्ये “ओपन जीम’चे फॅड निघाले आहे. मात्र, हे फॅड आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. या जीममुळे नागरिकांना व्यायामाची सवय लागत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये नेहमी मोबाईलमध्ये गुंतलेले तरूणही जीम करण्याकडे वळाले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकही स्वत:चे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीम करताना दिसतात. याच गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी जिल्ह्यामध्येही अशाप्रकारे जीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात विविध तालुक्‍यांमधील 73 ठिकाणी ही “ओपन जीम’ उभारण्यात आली आहेत. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्व ठिकाणच्या जीमचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामीण भागातील नागरिक आणि तरूणांना या जीमचा वापर करता येणार आहे.

एक जीम उभारण्यासाठी साधारण पावणेदोन लाख रुपये खर्च येत आहे. जीमची संकल्पनाच “ओपन जीम’ असल्यामुळे गावातील कोणत्याही नागरिकाला त्याठिकाणी जावून जीम करता येणार आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता लक्षात घेता या सर्व जीम संरक्षण भिंत असलेल्या मराठी शाळा, हायस्कूल याठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. त्याची देखभालही शाळेकडून होईल आणि जीमचे उद्दीष्ट साध्य होईल. तसेही ग्रामीण भागात शेतकरी दररोज कष्टाची कामे करून स्वत:चे शरीर दणकट बनवत असतो. मात्र, पोलीस किंवा लष्कर भरतीसाठी आवश्‍यक असलेली शरीरयष्टी तयार करण्यासाठी या जीमचा मोठा फायदा होणार आहे, असे कोहीणकर यांनी सांगितले.

………..
“ओपन जीम’मुळे नेहमी मोबाईलमध्ये गुंतलेला तरुणांला व्यायामाची सवय लागेल. तसेच भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना ही जीम महत्त्वपूर्ण ठरणार असून, जीममध्ये सर्व आवश्‍यक ती साधने आहेत. त्यामध्ये महिला आणि मुलीही या जीमचा वापर करू शकतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे.
– विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button