breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“करोनाविरोधी ‘स्पिरीट’ असंच वाढवलं पाहिजे, असं ठाकरे सरकारला वाटत असावं”

मुंबई |

राज्यातील ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. जिल्ह्यातील दारूबंदीसंबंधी वाढलेल गुन्हे आणि दारू तस्करांच्या हल्ल्यात अनेक पोलिसांना गमवावा लागलेला जीव गमवावा, याचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावरून आता सरकार विरोधकांच्या टीकेचे धनी ठरताना दिसत आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याच निर्णयावरून सरकारवर निशाणा साधला आहे. समाजसेवकांकडून होत असलेली मागणी आणि जनआंदोलनाच्या रेट्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये भाजपा सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गुन्हेगारी वाढत असल्याने ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यानिर्णयावर केशव उपाध्ये ट्विट करून टीका केली.

“दारूबंदी उठवली,
परीक्षा बंदी कायम..

दारूविक्रेत्यांची चिंता
महिला सुरक्षेचं तीनतेरा

सुरापानाला प्रोत्साहन
दुधउत्पादक मात्र वाऱ्यावर

आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत
जनता मात्र हालात बेहोश

कोरानाविरोधी ‘स्पिरीट’ असच वाढवलं पाहिजे, असं ठाकरे सरकारला वाटत असावं” अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार आल्यास जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेऊ, असं वचन आमदार सुधीर मुनंटीवार यांनी दिलं होतं. भाजपाचे सरकार येताच तत्कालीन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही वर्षात पोलीस उपनिरीक्षक, तथा पोलीस शिपाई यांच्या अंगावरून अवैध दारूविक्रेत्यांनी वाहन नेले, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे वातावरण हळूहळू गढूळ होत गेले. परिणामी, दारूबंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. सरकारने पुनर्विचार समिती स्थापन केली. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार निर्णय मागे घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button