breaking-newsराष्ट्रिय
आवक वाढल्याने गव्हाची २७ मिलियन टन उच्चांकी खरेदी
चंदिगढ : बाजारात जशी गव्हाची आवक वाढली आहे, तशी भारतीय अन्न मंडळाने खरेदीसाठी पाऊल उचलले आहे. २०१८-१९ च्या विपणन हंगामात गव्हाची एकूण खरेदी मागील आठवड्यापर्यंत २७ मिलियन टन (मेट्रिक टन) पर्यंत झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १२.५% अधिक आहे.
केंद्र शासनाने सध्याच्या वर्षी गहू खरेदीचे उद्दिष्ट ३२ मेट्रिक टन ठेवले आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३०.८ मेट्रिक टन होते. हरियाणामधील गहू खरेदी ७.९९ मेट्रिक टन राहिली. हे प्रमाण निर्धारित असलेल्या ७.४ मेट्रिक टनांपेक्षा जास्त तर मागील वर्षीच्या ७.४३ मेट्रिक टनांपेक्षा अधिक आहे.
यासोबतच, शेजाराच्या पंजाब राज्यात विविध संस्थांनी आतापर्यंत ११.५ मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. मागील वर्षी पंजाबमधील गहू खरेदीचे प्रमाण ११.७ मेट्रिक टन होते.