breaking-newsराष्ट्रिय

गुजरात सरकारचा मोठा निर्णय; पाच शहरात ७० मजली इमारती

गांधीनगर – गुजरात सरकारने दुबई आणि हॉंगकाँग प्रमाणे गुजरातच्या पाच शहरांमध्ये गगनचुंबी इमारती उभारण्याचे ठरविले आहे. गुजरातच्या गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये ७० मधल्या पेक्षा जास्त उंचीच्या इमारती उभारण्याचे गुजरात सरकारने ठरविले आहे. या “लँड मार्क” इमारती बांधण्यासाठी गुजरात सरकारने इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल ४ एफएसआय देण्याची घोषणा केली आहे. या गगनचुंबी इमारतींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची हिरे व्यापारी केंद्रे उभारण्याचाही मानस आहे.

गुजरातच्या पाच शहरांची ओळख ठरणाऱ्या या आयकॉनिक गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी गुजरात सरकारने बिल्डरांसाठी विशेष सुविधा प्रदान केल्या आहेत. या गगनचुंबी इमारती गुजरातच्या पाच शहरातील ४५ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत बांधण्यात येणार आहेत. रस्त्यापासून २०० मीटरच्या परिसरात या गगनचुंबी इमारती बांधता येतील. त्यासाठी सध्या असलेल्या १.५ एफ.एस.आयमध्ये बदल करून तो ४ एवढा करण्यात आला आहे. अर्थात हा ४ एफएसआय गुजरात मधील सर्व शहरातील इमारतींना मिळणार आहे.

या गगनचुंबी इमारती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील. त्यामध्ये पार्किंग एरिया, क्लब हाऊसेस, स्विमिंग पूल, बेसमेंट एरिया आदींचा यामध्ये समावेश असेल. या गगनचुंबी इमारतींमध्ये हिरे व्यापाराची केंद्रे बनण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button