breaking-newsमनोरंजन

सलमानच्या ‘भारत’मध्ये ‘या’ अभिनेत्रीची एंट्री !

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटात काही दिवसांपूर्वीच दिशा पटनीची एंट्री झाली आहे. आता नव्या रिपोर्टनुसार यात तब्बूची सुद्धा एंट्री झाली आहे. सध्या तब्बू यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाले, मी तब्बूचा खूप मोठा फॅन आहे आणि मला नेहमीच तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी खूप खूश आहे की तब्बू भारत चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. मी शूटिंग सुरु होण्याची वाट बघत आहे. भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक वापरली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button