breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना व्हायरसचा रुपीनगरला वाढता प्रादुर्भाव; पोलीस बंदोबस्त वाढवावा, राष्ट्रवादी काॅग्रेसची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या रूपीनगर तळवडे परिसर कोरोचा हॉटस्पाट ठरू लागला आहे रूपीनगर परिसरात आज पर्यंत १६ बाधित रूग्ण आढळले आहेत तर २४ एप्रिल रोजी एकाच दिवशी रूपीनगर परिसरातील तब्बल १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हायरिस्क कॉन्टॅक्टमधून आज पर्यंत १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे या परिसरात आणखी कोरोनाचे रूग्ण वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत असे असतांना देखील काही नागरिक विनाकारण घरा बाहेर फिरतांना दिसत आहेत कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरूवात करावी या परिसरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांचे मनुष्याबळ कमी पडत असल्याने या परिसरात तात्पुर्त्या स्वरूपात स्वरूपात पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button