breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना विषाणूचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी योग्य उपाययोजना करा

विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज अखेरपर्यंत सुमारे १२ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. मागील ६ दिवसांपासून एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे मनपा, पोलिस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे, परंतु कोरोना विषाणूचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अजून काही उपाययोजना करण्याची गरज आहे.
 
      प्रामुख्याने  शहरातील रस्ते, चौक व गर्दीच्या ठिकाणांची विशेषत:  भाजी मंडई, किराणा मालांची दुकाने, शहरातील मुख्य चौक, गृह निर्माण मोठ्या सोसायट्या या ठिकाणी दिवसातून दर चार तासांनी पुणे मनपाने ज्या पद्धतीने अग्निशामक दलाच्या टँकरमधून जंतूनाशक फवारणी केली जाते त्यापध्तीने आपल्या शहरात सुध्दा करण्यात यावी. तसेच झोपडपट्टी भागांमध्ये, छोट्या गल्ली बोळातून छोट्या तीनचाकी मालवाहू टेम्पोमधून जंतूनाशक फवारणी करण्यात यावी. जेणेकरुन या विषाणूचा प्रसार होणार नाही. परेदशवारी करुन आलेल्या नागरीकांना त्याच्या  घरीच १४ दिवस विलगीकरण कक्षात राहण्याचे अनिवार्य केले असले तरी  अनेक व्यक्ती फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांबरोबरच इतरांनाही कोरोनाची विषाणूची  लागण होण्याची शक्यता आहे. सक्तीचे विलनीकरण केलेल्या नागरीकांच्या घरी आरोग्य विभागातील कर्मचा-यांमार्फत दिवसातून एकदा अचानक भेट देण्यात यावी. किंवा शक्य असल्यास  परदेशातून येणा-या प्रत्येक नागरीकांस विलगीकरण कक्षामध्ये सक्तीने ठेवण्यात यावे. त्यादृष्टीकोनातून विलगीकरण कक्ष वाढण्यात यावेत.
 
     तसेच शहराच्या काही भागांमध्ये घरगुती गँस सिलेंडरसाठी नागरीक गर्दी करीत आहेत, असे दिसून येत आहे त्यामुळे तिथे विषाणू पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे घरपोच गॅस वितरणासाठी संबंधितांना सुचना देण्यात याव्यात जेणे करुन नागरीक गँससाठी एकत्र येणार नाहीत. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाबरोबरच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button