TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

खारघर दुर्घटना प्रकरण: राज्य शासन, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : खारघर, नवी मुंबई येथे झालेली दुर्घटना ही अत्यंत गंभीर असून राज्य शासन आणि आयोजक या दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी लपवित आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी १४ श्री सेवकांचा झालेला मृत्यू ही मानवनिर्मित चुक असून या प्रकरणी राज्य शासन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करणाऱ्यां विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना अजित गव्हाणे यांनी लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जमलेल्या निष्पाप श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. सुरुवातील १३ श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली होती. मात्र त्यापेक्षा मृत्यू झालेल्यांची संख्या ही कितीतरी अधिक आहे. ही आकडेवारी शासनाकडून लपविण्यात येत आहे.

राज्य शासन आणि आयोजकांनी हा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, असा आमचा आरोप आहे. स्वत:च्या मार्केटींगसाठी केलेल्या प्रकारामुळे निष्पाप असलेल्या श्री सेवकांचा अन्न आणि पाण्यावाचून मृत्यू झाला. आयोजकांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. प्रचंड तापमान असतानाही मंडप, पाणी, औषधे, रुग्णवाहिका यासारख्या बाबींकडे दूर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मृत्यूंना केवळ शिंदे-फडणवीस सरकारचा व आयोजकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्यामुळे राज्य शासन व आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे अजित गव्हाणे यांनी केली आहे.

यावेळी निवेदन देताना, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, प्रवक्ते विनायक रणसुभे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, जगन्नाथ साबळे, खजिनदार दिपक साकोरे, संतोष बारणे, लिगल सेल अध्यक्ष संजय दातीर पाटील, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, देवेंद्र तायडे, पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप, उपाध्यक्ष अभिजीत आल्हाट, बाळासाहेब पिल्लेवार, सरचिटणीस राजन नायर, अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, विजय दळवी, सदस्य महेश माने, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, चिंचवड विधानसभा महिला मिरा कदम, केरला समाज अध्यक्षा श्रीलता नारायणन, रविंद्र सोनवणे, संतोष काळजे, अनिल भोसले, अशोक मगर, ज्योती गोफणे, विशाखा इंदूलकर, संतोष तापकिर, महिला उपाध्यक्ष सपना कदम, निलम कदम, अण्णा पारवटे, सुरेखा माने,निखिल घाडगे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button