breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरसह गंभीर, विराटचे ट्विट; म्हणाले…

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकार पुढे आले आहेत. मंगळवारी जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थॅनबर्गसारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. मात्र त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात त्यांना फटकारलं. तर गौतम गंभीरनेही मोदींवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं. त्याचबरोबर क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू कुंबळे, क्रिकेटपटू धवन आणि रैनानेही ट्विट करत शेतकरी आंदोलनावर आपली मतं मांडली आहेत.

वाचा :-सरकारी आदेशाचे पालन करा, नाहीतर कारवाई करू! ट्विटरला केंद्राचा इशारा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.’

तर भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने म्हटले आहे, ‘बाह्य शक्ती आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शतके त्यांनी आपल्यावर राज्य केले. परंतु भारत या सगळ्यावर मात करीत आलेला आहे आणि पुढेही करीत राहील. तुम्ही अब्जावधीची संपत्ती वापरून पाहा. हा नवीन भारत आहे.’

तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ‘मतभेदांच्या या काळात आपण संघटित राहूया. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. मला खात्री आहे की दोन्ही बाजूंनी योग्य मार्ग लवकरच निघेल.’

तसेच ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो आहे’, असे मत माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी मांडले आहे.

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, ‘एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.’

त्याचबरोबर ‘देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा’, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button