breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे महापालिकेच्या सामान्य कर सवलत योजनेला मुदतवाढ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांना करांमध्ये सवलत देण्यात येते. 30 जून सवलतीची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. असा आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने काढला आहे.

पिपरी-चिंचवड महापालिकेमार्फत दरवर्षी 30 जूनपूर्वी दोन्ही सहामाहीत संपूर्ण मिळकत कर बिलाची रक्कम आगाऊ भरणा करणा-या मिळकतधारकांना, माजी सैनिकांचे नावे असलेल्या मिळकती, फक्त महिलांचे नावे असलेल्या मिळकती, 40 % पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या नि:समर्थ मिळकतधारकांच्या मिळकतींना सामान्य कराने चालू मागणीत 5 ते 50 % पर्यंत सवलत देण्यात येते. सध्या कोविड – 19 चा प्रादुर्भाव विचारात घेता मिळकतधारकांना सदर कालावधीत सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेता आलेला नाही. अशा मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ मिळणेचे दृष्टीने सदर सवलत योजनेस दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच जे मिळकतधारक थकबाकीसह (अवैध बांधकाम शास्ती कराची रकम वगळून) संपूर्ण मिळकतकराची एक रकमी 100 % रक्कम भरणा करतील त्यांना आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे 90 % सवलतीच्या अभय योजनेसही दिनाक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

नागरिकांना महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्ये रोख / धनादेश / डी.डी.द्वारे मिळकत कराचा भरणा करता येईल. तसेच, महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी दिनांक 31 ऑगस्ट 2020 पूर्वी एक रक्कमी मिळकत कराचा भरणा करुन सामान्य करातील विविध सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button