breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि.19) अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न दिल्याने भाजपच्या पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता होणार आहे.

विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. सत्ताधारी भाजपने विधी समितीच्या अध्यक्षपदी स्वीनल म्हेत्रे. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी चंदा लोखंडे. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी सोनाली गव्हाणे. कला-क्रीडा-सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी उत्तम केंदळे. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मनीषा पवार यांना संधी दिली.

महापालिकेच्या प्रत्येक विषय समितीत नऊ सदस्य आहेत. प्रत्येक समितीत अध्यक्षांसह भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन व शिवसेनेचा एक सदस्य आहे. संख्या बलानुसार भाजपच्याच सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळेल, हे स्पष्ट होते.

पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. विषय समित्यांमध्ये बलाबल कमी असल्याने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने शिक्षण समितीपदी मनीषा पवार यांना सलग दुसऱ्यावेळी तर स्वीनल म्हेत्रे आणि सोनाली गव्हाणे यांना पुन्हा एकदा सभापतीपद दिले आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद कामकाज पाहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button