breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनातील टाळेबंदी व विनाकारण कच्या मालाच्या दरवाढीमुळे उद्योग अडचणीत

  • नवीन उद्योगांपुढे रेड कार्पेट अंथरणाऱ्या दोन्ही सरकारकडून मोठ्या अपेक्षा
  • अन्यथा राज्यातील उद्योगक्षेत्र कोसळण्याच्या मार्गावर – जयदेव अक्कलकोटे

पिंपरी / महाईन्यूज

महाराष्ट्रात सूक्ष्म आणि लघु उद्योगाशी निगडित संस्थांची संख्या ८ लाख इतकी आहे. कोव्हिड १९ मुळे देशात नोंदणीकृत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मोठी झळ बसली आहे. उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने नवीन उद्योगांचं स्वागत रेड कार्पेट घालून करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच, धातू-रसायने व कच्च्या मालात झालेल्या ५० टक्के किंमतवाढीमुळे लघु उद्योजकांना सर्वाधिक फटका बसत आहे. उद्योगक्षेत्र आता कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या उद्योगांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. उद्योगांना सावरण्याचा दोन्ही सरकारकडून  प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कोरोनानंतर (Corona) जून महिन्यापासून हळूहळू उद्योग पूर्वपदावर येत आहेत. उद्योगातील तयार वस्तूंना आता कुठे बाजारपेठ खुली होत आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमती अवास्तव वाढत आहेत. त्यामुळे करोना काळातील टाळेबंदीने आर्थिक फटका बसलेल्या उद्योगक्षेत्राच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. याचा सर्वाधिक फटका राज्यभरातील लघु उद्योजकांना बसत आहे.

मार्च २०२० पासून लागलेल्या टाळेबंदीमुळे तब्बल ३ महिने सर्वच उद्योग बंद होते. त्यानंतर टाळेबंदी शिथिल झाली. परंतु सरकारने जाहीर केलेल्या करोना मार्गदर्शक तत्त्वांमुळे उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या. बाजारातून मागणी कमी असल्याने उत्पन्नात घट झाली. अशा सर्व संकटांचा सामना उद्योजक करीत असतानाच गेल्या २ महिन्यापासून कच्च्या मालाच्या किंमतीत ५० टक्के वाढ झाली आहे. पूर्व नोंदणी केलेल्या उत्पादनाची पूर्तता करताना नवीन दरातील कच्चा माल खरेदी करताना उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या स्टील, लोखंड, कॉपर, मँगनीज, ब्रांझ, अ‍ॅल्युमिनियम आदी धातू, रसायन, चांदी तसेच क्राफ्ट बॉक्सच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन क्षमता कमी असलेले उद्योग प्रभावित होत आहेत. त्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.


कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा फटका लघु व मध्यम उद्योगाला बसत आहे. कच्च्या मालाच्या किमतीत ५० टक्क्यांनी वाढीचे कारण अस्पष्ट आहे. मागणी घसरली असताना उत्पादन खर्च वाढणे हे उद्योगांवर संकटाचेच ठरेल. केंद्र व राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच त्वरित यावर उपाययोजना होणे क्रमप्राप्त ठरेल.

अध्यक्ष- जयदेव महादेव अक्कलकोटे, चाकण एमआयडीसी फेज ३ उद्योजक संघटना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button