breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अर्धवट ठराव अमलात आणल्याने संभाजी ऐवले यांच्यावर अन्याय

  • पदोन्नती ठराव क्रमांक 578 ची अर्धवट अंमलबजावणी
  • शासकीय बाबींनुसार पात्र असूनही करावी लागतेय प्रतिक्षा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आणि इतर अधिका-यांच्या पदोन्नतीचा ठराव क्रमांक 578 महासभेत मंजूर असताना प्रशासनाने तो अर्धवट अमलात आणला आहे. अधिकारी ऐवले यांच्या पदोन्नतीला कात्री लावून अन्य कर्मचा-यांना बढती देण्यात आली आहे. ऐवले याची सेवानिवृत्ती जवळ आलेली असताना देखील त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर खेद व्यक्त केला जात आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाचे संभाजी ऐवले हे मुख्य समाज विकास अधिकारी, आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे हे आरोग्य कार्यकारी अधिकारी, सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी उदय जरांडे हे मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सहायक सुरक्षा अधिकारी विलास वाबळे हे सुरक्षा अधिकारी पदावर पदोन्नतीस पात्र ठरतात. त्यांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, आरक्षण, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादी सेवाविषयक तपशिल तपासून त्यांच्या पदोन्नतीसाठी ठराव क्रमांक 578 पारित करण्यात आला. त्याला 13 ऑक्टोबर 2020 च्या महासभेत मान्यता देण्यात आली. मात्र, पालिका प्रशासनाने संपूर्ण ठरावाची अंमलबजावणी करण्याऐवजी अर्धवट ठराव आमलात आणला आहे. त्यामुळे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची पदोन्नती रखडली आहे.

यातील बेंडाळे, जरांडे, वाबळे यांना प्रशासनाने वरील बदावर बडती दिली. मात्र, ऐवले यांना नागरवस्ती विकास योजना विभागाच्या मुख्य समाज विकास अधिकारी पदावर पदोन्नती दिली नाही. ऐवले यांची सेवा आगदीच काही महिने राहिलेली आहे. तरी, त्यांना रितसर मंजूर ठरावानुसार उमेद मान्यतेवर पदोन्नती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ऐवले यांना प्रशासकीय अन्याय सहन करावा लागत आहे. उशीर झाला असला तरी आयुक्तांकडून नक्कीच न्याय मिळण्याची आपेक्षा त्यांनी बाळगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button